Posts

Showing posts from September, 2021

"आभाळा"

 "आभाळा" आभाळा का छळतोस सकळा थांब आतातरी येऊ दे कळवळा हैराण झाले प्राणीमात्र सारे वाहून चालले संसार पसारे//१// बुडीत झाले बरेच क्षेत्र संकटाने ओले केले नेत्र "आभाळा"आवर संताप आता तुच दाता तुच विधाता //२// पाहवेना दैना दीन दुखितांची येऊ दे दया साऱ्या प्राणिमात्रांची वेळी अवेळी असा बरसू नको राबत्या हाताला घरात बसवू नको//३// कवी: जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद. ©® @जनार्दन

" वर्गमित्र १९९८"

 " वर्गमित्र १९९८" सारे वर्गमित्र होतो एकत्र लिहीत होतो, निबंध आणि पत्र वर्ष १९९८ चे दहावीचे होते परीक्षेच्या चिंतेत सारेच होते//१// कुणी अडला, कुणी घडला तर चिंतेत कुणी बिघडला जो तो असे विचारात मग्न समोर उभे परीक्षेचे विघ्न//२// झाली परीक्षा, निकाल हाती कुणाची ओली, डोळ्यांची पाती वर्गमित्र केले परीक्षेने वेगळे केविलवाणे झाले मन कोवळे//३// आता कोण कुठे कळत नाही वर्ग मित्रांची भेट घडत नाही व्हॉट्स ऍप द्वारे भेटले पुन्हा उमटल्या पुन्हा जुन्या पाऊलखुणा//४// दिनांक २६/०९/२०२१ कवी: जनार्दन बाळा गोरे वाकी तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद.🙏🙏🙏 @जनार्दन ©®

"ओळख कवीची"

 "ओळख कवीची" विचारांच्या वाटा, सागराच्या लाटा स्मितहास्य गाली, मुखी प्रसन्न छटा ओळख अशी कवीची असते मर्म जीवनाचे, कविलाच कळते//१// मोजकेच बोलणे, विचारांना तोलने भाव मनातील, लिहून काढणे तळमळ साऱ्यांची,मनात वसते  ओळख अशी कवीची असते//२// पाने, फुले, रान वेली ऊन, पाऊस आणि सावली विषयांची कमी कधी नसते ओळख अशी कवीची असते//३// मन होऊन पाखरू उडे वाचन, लिखाणाचे वेड जडे रचनेत ज्याला सुख गवसते ओळख अशी कवीची असते//४// छंद जोपासून, मिळवतो शांती करतो निर्माण कवितेची उत्क्रांती दयेचे पाझर, मनात दाटते ओळख अशी कवीची असते//५// दिनांक २७/०९/२०२१ कवी: जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद. @जनार्दन ©®

"बारिश"

 "बारिश" थम जा जरा कम बरसात कर 2 पाणी हि पाणी दिखे ईधर उधर...2 थम जा जरा, कम बरसात कर.2//1/ जम गया है पाणी, हो रही हैं हानी  कबतक चलेगी तेरी यह मनमानी हो रही खराब सारी फसल..... थम जा जरा कम बरसात कर 2//2// जीव सारे हो रहे परेशान पाणी के डर से आ गयी थकान कुछ तो होने दे खुदपर असर....... थम जा जरा कम बरसात कर 2//3// कर खुला सारा आसमान अब सब के मन तु पहचान रुककर अब कम कर फिकर..... थम जा जरा कम बरसात कर 2//4// दिनांक 22/09/2021. कवि जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद. @जनार्दन ©®

"पावसा आता बास झाले"

 "पावसा आता बास झाले" पावसा आता बास झाले साऱ्यांचेअतोनात नुकसान केले झाला खुप अवकाळीचा मारा पाडल्या दगडासारख्या तु गारा... मनाने सारे हवालदिल झाले..... पावसा आता बास झाले....//१// नदी, नाले सारेच तुडुंब भरले अवकाळीने डोके मात्र गरगरले  झाले शेतकरी खूपच हैराण बुडविले पाण्यात सारेच रान झाले आसवांनी, डोळे ओले..... खरंच पावसा आता बास झाले//२// रात्री अपरात्री होतो तुझा वर्षाव हेलकावे घेते जीवनाची रे नाव येऊ दे दया आता प्राणीमात्रावर मार्गस्थ हो परतीच्या प्रवासावर आभाळ सारे कर आता खुले.... पावसा आता बास झाले.... साऱ्यांचे अतोनात नुकसान केले//३// दिनांक २२/०९/२०२१ कवी: जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद. @जनार्दन ©®

"निरोप गणराया तुम्हास"

 "निरोप गणराया तुम्हास" आज अनंत चतुर्दशी नऊ दिवस आपल्या भक्तांच्या सहवासात राहून दहाव्या दिवशी आपण आपल्या घराकडे प्रस्थान करत आहात. जाता, जाता सांगणे एवढेच आहे की, आपल्या साऱ्या भक्तांचे रक्षण कर. त्यांचे आरोग्य दुःख दारिद्रय यावर तुझी नजर सतत असू दे. सारे दुर्गुण हे सद्गुणात परावर्तीत कर बाप्पा मोरया गजानना जरी आज तु परत जात आहे तरी तुझा निवास हा भक्तांच्या हृदयात आहे. आता इथून पुढे कोणतीच महामारी येऊ नये अशी मनोभावे प्रार्थना आपल्या चरणी करतो. येऊ दे पुन्हा दिवस पूर्वीसारखे मनमोकळे पाहू दे साऱ्यांना आनंदाचे सोहळे सुख समृद्धीच्या वाटा दिसू दे गणपती बाप्पा पुढच्या वर्षी येताना अगणित सूखे सोबत घेऊन यावे. नसाव्या कुणाच्याही चेहऱ्यावर दुखांच्या छटा. गणपती बाप्पा मोरया दरवर्षी  आनंद, हर्ष आरोग्य संपदा घेऊन या...... कवी: जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद. @जनार्दन   ©® दिनांक १९/०९/२०२१

"शुभ प्रभात"

 "शुभ प्रभात" बीत गयी काली रात हो रही रिमझिम बरसात एक नये दिन की शुरुवात कहता हुं शूभ प्रभात//१// साहित्यिक मित्र मंडल को  शुभ प्रभात🙏🙏🙏 कवि: जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद.

"बैलपोळा सण"

 "बैलपोळा सण" पाहून बैलांचा शृंगार सोहळा आठवतो साऱ्यांना बैलपोळा लावतो शेतकरी, बैलांना लळा गळ्यात शोभते खास घुंगरमाळा//१// सरताना श्रावण,येतो पोळा सन पुरणपोळी भरवून करती सारे नमन डौलदार दिसे रुबाब नंदीचा चाले ऐटीत दास महादेवाचा//२// झुल पाठीवर, रंग शिंगांवर दिसे खुलून सारे,रान शिवार "बैलपोळा"सण बैलांचा भारी मिळे मनाला त्यांच्या नवी उभारी//३// शेतकरी,कष्टकरी, करी साजरा सण जो राबतो शेतात करुण वणवण सणाच्या दिवशी त्यास असे आराम रोजच पाझरतो त्याच्या कपाळी घाम//४// दिनांक ०६/०९/२०२१ कवी: जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद. @जनार्दन ©®

"आत्मनिर्भर मन"

 "आत्मनिर्भर मन" कोई जिये या चाहे मरे किसी को कुछ नहीं लेना सबको खुद की पडी हैं यह कलियुग हैं यह जाना....//1// सब सोचते अपना, अपना भूल गये सब नाता पुराना... अब ज्यादा कुछ ना सोचना यह कलियुग हैं यह जाना.... कोई//2// बात कोई सूने ना किसकी बात चलाये अपने, मन की क्या खोना क्या पाना.... यह कलियुग हैं यह जाना....//3// अपना हल खुद ही जानो अच्छे, बुरे को पहचानो अब मन ही मन चुप रहना यह कलियुग हैं यह जाना....!!४!! कवि: जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद. @जनार्दन ©® दिनांक 06/09/2021

"बोलण्याची कला"

" बोलण्याची कला"        बड, बड खड, खड बोलण्याची कला सध्या तरी नाही, अवगत मला जरी बोलणे, कमी आहे तरी शब्दांचा डोंगर मनी आहे//१//        मुद्याच आणि,मोजकच बोलणं आहे साधं सोपं राहणं आहे चांगलं तेच पाहणं आहे अन् शांत, निवांत राहणं आहे//२// पाहून मोका मारू चौका, त्यातला मी नाही नियत बूरी, स्वार्थाची तिजोरी माझी नाही मोठेपणाचा भाव, फुकटचा नकोसा वाटतो स्वतःच स्वतःचे स्थान वेगळे हे जाणतो//३// जे मनाला भावेल तेच लिहिण्याचा स्वभाव चांगुलपणाचा माझ्याकडे नाही अभाव ध्यास एकच, जीवनाचं रहस्य काय? प्रत्येक समस्येला काय उपाय?//४// जगात शांतता नांदावी, हीच असते सदिच्छा दुःखात जगनारांची, वाट सुखकर व्हावी हीच इच्छा आशा करतो मनात मोठी गोड बोल असावे सर्वांच्या ओठी//५//       गोरे जनार्दन बाळा औरंगाबाद. 

"Sapno ki alag duniya"

         "Sapno ki alag duniya" Sapno ki alag duniya Har pal har roj dekhana Chah Dil me jamaye rakhana Har samay kuch sabak sikhna!!1!! Na hona udas kabhI Milegi jarur kamyabi Rukh na modna kabhi Tum par aas lagaye sabhi!!२!! Bhul javo biti bato ko Rang do apne sapno ko Kuch alagsa karke dikhavo tum Sapno ko khub saras banavo tum!!3!! Date:03/09/2021 Writer/poet:janardan Bala Gore. Aurangabad Maharashtra.

"शाळा"

 "शाळा" .... गोरे जनार्दन शाळा आहे ज्ञानाचे भांडार शाळेमध्ये वाढतो आपला व्यवहार जगाचे ज्ञान, शाळेत मिळते नोकरीही शिकल्यानेच मिळते//१// माणसाला वळण लावते शाळा गणित शिकवितो, बोर्ड काळा गुरुजन लावतात, विद्यार्थ्यास लळा शाळेत भरतो,बाळगोपाळांचा मेळा//२// वेळेवर वाजते, शाळेची घंटी शाळेला असते, रविवारी सुटी शाळा जगण्याला, देते दिशा शाळेत कळतो, जगाचा नकाशा//३// शाळा शिकविते, अनेक भाषा चुकले काही तर, गुरुजी करतात शिक्षा मनात भरते, बालपणीची शाळा शाळा म्हणजे, आनंदाचा सोहळा//४// शाळेला दांडी, मारू नये ज्ञानाची घडी, मोडू नये शाळेत करावा, गुरुजनांचा आदर गुण चांगले, करावे सादर भरून घ्यावी, ज्ञानाची घागर//५// ..... गोरे जनार्दनबाळा औरंगाबाद.