"बोलण्याची कला"
" बोलण्याची कला"
बड, बड खड, खड बोलण्याची कला
सध्या तरी नाही, अवगत मला
जरी बोलणे, कमी आहे
तरी शब्दांचा डोंगर मनी आहे//१//
मुद्याच आणि,मोजकच बोलणं आहे
साधं सोपं राहणं आहे
चांगलं तेच पाहणं आहे
अन् शांत, निवांत राहणं आहे//२//
पाहून मोका मारू चौका, त्यातला मी नाही
नियत बूरी, स्वार्थाची तिजोरी माझी नाही
मोठेपणाचा भाव, फुकटचा नकोसा वाटतो
स्वतःच स्वतःचे स्थान वेगळे हे जाणतो//३//
जे मनाला भावेल तेच लिहिण्याचा स्वभाव
चांगुलपणाचा माझ्याकडे नाही अभाव
ध्यास एकच, जीवनाचं रहस्य काय?
प्रत्येक समस्येला काय उपाय?//४//
जगात शांतता नांदावी, हीच असते सदिच्छा
दुःखात जगनारांची, वाट सुखकर व्हावी हीच इच्छा
आशा करतो मनात मोठी
गोड बोल असावे सर्वांच्या ओठी//५//
गोरे जनार्दन बाळा
औरंगाबाद.
Comments
Post a Comment