"बैलपोळा सण"
"बैलपोळा सण"
पाहून बैलांचा शृंगार सोहळा
आठवतो साऱ्यांना बैलपोळा
लावतो शेतकरी, बैलांना लळा
गळ्यात शोभते खास घुंगरमाळा//१//
सरताना श्रावण,येतो पोळा सन
पुरणपोळी भरवून करती सारे नमन
डौलदार दिसे रुबाब नंदीचा
चाले ऐटीत दास महादेवाचा//२//
झुल पाठीवर, रंग शिंगांवर
दिसे खुलून सारे,रान शिवार
"बैलपोळा"सण बैलांचा भारी
मिळे मनाला त्यांच्या नवी उभारी//३//
शेतकरी,कष्टकरी, करी साजरा सण
जो राबतो शेतात करुण वणवण
सणाच्या दिवशी त्यास असे आराम
रोजच पाझरतो त्याच्या कपाळी घाम//४//
दिनांक ०६/०९/२०२१
कवी: जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद.
@जनार्दन ©®
Comments
Post a Comment