"निरोप गणराया तुम्हास"
"निरोप गणराया तुम्हास"
आज अनंत चतुर्दशी नऊ दिवस आपल्या भक्तांच्या सहवासात राहून दहाव्या दिवशी आपण आपल्या घराकडे प्रस्थान करत आहात. जाता, जाता सांगणे एवढेच आहे की, आपल्या साऱ्या भक्तांचे रक्षण कर. त्यांचे आरोग्य दुःख दारिद्रय यावर तुझी नजर सतत असू दे. सारे दुर्गुण हे सद्गुणात परावर्तीत कर बाप्पा मोरया गजानना जरी आज तु परत जात आहे तरी तुझा निवास हा भक्तांच्या हृदयात आहे. आता इथून पुढे कोणतीच महामारी येऊ नये अशी मनोभावे प्रार्थना आपल्या चरणी करतो.
येऊ दे पुन्हा दिवस पूर्वीसारखे मनमोकळे पाहू दे साऱ्यांना आनंदाचे सोहळे सुख समृद्धीच्या वाटा दिसू दे गणपती बाप्पा पुढच्या वर्षी येताना अगणित सूखे सोबत घेऊन यावे.
नसाव्या कुणाच्याही चेहऱ्यावर दुखांच्या छटा. गणपती बाप्पा मोरया दरवर्षी आनंद, हर्ष आरोग्य संपदा घेऊन या......
कवी: जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद.
@जनार्दन
©®
दिनांक १९/०९/२०२१
Comments
Post a Comment