" वर्गमित्र १९९८"

 " वर्गमित्र १९९८"

सारे वर्गमित्र होतो एकत्र

लिहीत होतो, निबंध आणि पत्र

वर्ष १९९८ चे दहावीचे होते

परीक्षेच्या चिंतेत सारेच होते//१//

कुणी अडला, कुणी घडला

तर चिंतेत कुणी बिघडला

जो तो असे विचारात मग्न

समोर उभे परीक्षेचे विघ्न//२//

झाली परीक्षा, निकाल हाती

कुणाची ओली, डोळ्यांची पाती

वर्गमित्र केले परीक्षेने वेगळे

केविलवाणे झाले मन कोवळे//३//

आता कोण कुठे कळत नाही

वर्ग मित्रांची भेट घडत नाही

व्हॉट्स ऍप द्वारे भेटले पुन्हा

उमटल्या पुन्हा जुन्या पाऊलखुणा//४//

दिनांक २६/०९/२०२१

कवी: जनार्दन बाळा गोरे

वाकी तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद.🙏🙏🙏

@जनार्दन

©®

Comments