"पावसा आता बास झाले"
"पावसा आता बास झाले"
पावसा आता बास झाले
साऱ्यांचेअतोनात नुकसान केले
झाला खुप अवकाळीचा मारा
पाडल्या दगडासारख्या तु गारा...
मनाने सारे हवालदिल झाले.....
पावसा आता बास झाले....//१//
नदी, नाले सारेच तुडुंब भरले
अवकाळीने डोके मात्र गरगरले
झाले शेतकरी खूपच हैराण
बुडविले पाण्यात सारेच रान
झाले आसवांनी, डोळे ओले.....
खरंच पावसा आता बास झाले//२//
रात्री अपरात्री होतो तुझा वर्षाव
हेलकावे घेते जीवनाची रे नाव
येऊ दे दया आता प्राणीमात्रावर
मार्गस्थ हो परतीच्या प्रवासावर
आभाळ सारे कर आता खुले....
पावसा आता बास झाले....
साऱ्यांचे अतोनात नुकसान केले//३//
दिनांक २२/०९/२०२१
कवी: जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद.
@जनार्दन
©®
Comments
Post a Comment