"आभाळा"

 "आभाळा"

आभाळा का छळतोस सकळा

थांब आतातरी येऊ दे कळवळा

हैराण झाले प्राणीमात्र सारे

वाहून चालले संसार पसारे//१//

बुडीत झाले बरेच क्षेत्र

संकटाने ओले केले नेत्र

"आभाळा"आवर संताप आता

तुच दाता तुच विधाता //२//

पाहवेना दैना दीन दुखितांची

येऊ दे दया साऱ्या प्राणिमात्रांची

वेळी अवेळी असा बरसू नको

राबत्या हाताला घरात बसवू नको//३//

कवी: जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद.

©®

@जनार्दन

Comments

Popular posts from this blog

"पासिंग नंबर"

"मौन निमंत्रण"