"मातृभूमी"
मातृभूमी मातृभूमी साठीच जन्मले ते झाले महान,थोर सोसल्या खूप यातना होता पारतंत्र्याचा घोर//१// मातृभूमीला सलाम केला तिच्या सेवेत होऊन लीन लढले स्वातंत्र्यासाठी खूप जुलूम अन्याय सोसून //२// मातृभूमीशी राखून ईमान त्यांचे विचार हटले नाही मागे प्राण पणाला लावून लढले दान दिले जीवन अवघे. //३// मातृभूमीला श्रेष्ठ मानून तिच्यासाठी तुरुंगवासही भोगला रक्षण करण्या मातृभूमीचे महापुरुषांनी देहही त्यागला//४// मातृभूमीस केले प्रथम वंदन रचला इतिहास मोठ्या कार्याचा गेले महान होऊन जगात ठसा उमटविला आपल्या कर्तृत्वाचा//५// कवी: जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद. दिनांक २३/०७/२०२०. विषय: जीवन कसे वर्णावे सार जीवनाचे जीवन कधी सुखाचे कधी दुःखाचे कधी जीवनात सुखांची जत्रा कधी वाढतो संकटांचा खत्रा//१// आत्म ज्ञान जीवनात मिळते आयुष्य एका वळणावर थांबते वाटा सुखाच्या शोधताना पुढच्या दिशा बदलतात आपल्या मनाच्या//२// स्वप्ने पळवतात...