"भरती"
"भरती"
भरतीसाठी अर्ज येतात हजारांवर
उपासमारीची वेळ येते बेरोजगारांवर
कसे बसे पोहचतात ठिकाणावर
काय बरे वाटत असेल त्यांच्या मनावर!
रोजगार वाढले तरी बेकारी
कुठवर चालेल अशी बेरोजगारी
अर्जदार येतात, कुठून, कुठून
कधी, कधी गाडी जाते सुटून !
गरज नोकरीची असते म्हणून
प्रश्न उदर निर्वाहाचा सतावतो म्हणून
होते गर्दी अतोनात बेकारांची
ओळखावी गरज खरी बेकारांची!
ठेऊन विश्वास, त्या विधात्यावर
नको नको ते प्रश्न असतात मनावर
बेकारीची कुऱ्हाड, घेऊन डोक्यावर
जगतो बेकार, नोकरीच्या आशेवर !
कवी: जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद.
@जनार्दन
©®
दिनांक २०/०१/२०२२
Comments
Post a Comment