"मकर संक्रांत"

 दिनांक १४/०१/२०२२.

      "मकर संक्रांत"

आज मकर संक्रांत या गोड दिवसाच्या निमित्ताने आज लिहावे असे वाटले म्हणून लेखास सुरुवात केली. मकर संक्रांत म्हणजे तीळ गुळ घ्या गोड गोड बोला. असे साधारणतः आपण बोलत असलो तरी आपण ते तेवढ्या दिवसा साठी मर्यादित ठेवतो. सणाच्या निमित्ताने का होईना नात्यातील कटुता

काही दिवसांसाठी गोडव्यात रुपांतरीत होते. नंतर आपण "जैसे थे"वैसे वागू लागतो याला काही अर्थ उरत नाही.

मला तर असे वाटते की आपल्यात कधीही कटुता येऊ नये. शब्दांचे मोल प्रत्येकाने जाणले पाहिजे. नुसतेच जाणुन उपयोग नाही तर ते अमलात आणणे हाच खरा मानव धर्म आहे.

तिमिरातून तेजाकडे जाण्यासाठी आडवाटेनं न जाता कठोर तपश्चर्या करून म्हणजे परिश्रम करून आपल्यातील कलागुणांना प्रसारीत करून जीवनातील तेज निर्माण करून पुढें जाण्यात खरी मजा असते. स्वतःला सिद्ध करुन, जीवनातील दुःखे दुर सारून पुढचा मार्ग काढत जावे.

          मकर संक्रांतीच्या निमित्ताने हे लेखन करण्याचा विचार मनात आला आणि त्यानिमित्ताने मी लिहू शकलो.

बोलण्यात आणि वागण्यात गोडवा हा कायम स्वरुपी राहील ही दक्षता प्रत्येकाने घेतली तर परस्पर वैमनस्य निर्माण होणार नाही.आणि गोडव्यानं सर्व समस्यांचे निवारण माणसाला करता येईल. मी पणाला थारा न देता "आपण" या शब्दाला जीवनात कायम स्वरुपी जागा दिल्यास माणसातील आणि नात्यातील कटुता कायमची संपुष्टात येईल आणि प्रत्येक माणूस खऱ्या अर्थानं सुखी समाधानी राहील असे मला वाटते.


   सर्वांना"मकर संक्रांतीच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तीळ गुळ घ्या, आणि सदैव गोड रहा....

💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

   आपलाच कवी

जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद.

@जनार्दन

©®

Comments

Popular posts from this blog

"पासिंग नंबर"

"मौन निमंत्रण"