"मातृभूमी"
मातृभूमी
मातृभूमी साठीच जन्मले
ते झाले महान,थोर
सोसल्या खूप यातना
होता पारतंत्र्याचा घोर//१//
मातृभूमीला सलाम केला
तिच्या सेवेत होऊन लीन
लढले स्वातंत्र्यासाठी खूप
जुलूम अन्याय सोसून //२//
मातृभूमीशी राखून ईमान
त्यांचे विचार हटले नाही मागे
प्राण पणाला लावून लढले
दान दिले जीवन अवघे. //३//
मातृभूमीला श्रेष्ठ मानून
तिच्यासाठी तुरुंगवासही भोगला
रक्षण करण्या मातृभूमीचे
महापुरुषांनी देहही त्यागला//४//
मातृभूमीस केले प्रथम वंदन
रचला इतिहास मोठ्या कार्याचा
गेले महान होऊन जगात
ठसा उमटविला आपल्या कर्तृत्वाचा//५//
कवी: जनार्दन बाळा गोरे
औरंगाबाद.
दिनांक २३/०७/२०२०.
विषय: जीवन
कसे वर्णावे सार जीवनाचे
जीवन कधी सुखाचे कधी दुःखाचे
कधी जीवनात सुखांची जत्रा
कधी वाढतो संकटांचा खत्रा//१//
आत्म ज्ञान जीवनात मिळते
आयुष्य एका वळणावर थांबते
वाटा सुखाच्या शोधताना पुढच्या
दिशा बदलतात आपल्या मनाच्या//२//
स्वप्ने पळवतात माणसाला सदा
पळता, पळता वाढते मनाची द्विधा
जगताना जीवन, घडते बरेच काही
हाती थोडे अन् व्यर्थ जाते खुप काही//३//
जीवनाची बिकट वाट संपत नाही
माणसाला स्वप्नांचा थाट मिळत नाही
कळत नाही जीवनाचा अर्थ कुणाला
जगतो माणूस लावून प्राण पणाला //४//
जीवन आशेवर जगतो माणूस
कधी तुपाशी कधी उपाशी असतो माणूस
नकारात्मक विचार पाठ सोडत नाही
माणसाला हवे ते कधी मिळत नाही//५//
कवी: जनार्दन बाळा गोरे
औरंगाबाद.
@जनार्दन
Comments
Post a Comment