"पहाट"
"पहाट"
नवी पहाट, नवी वाट
घेऊन आली, रम्य प्रभा
गोड लागते, ऊब थोडीशी
रवि किरणे, वाढविती शोभा//१//
दवबिंदूत न्हाली सारी धरणी
किलबिलाट एकाहून एक सरस
जागली पक्ष्यांची कोकिळा राणी
कुहू, कुहु गात रम्य गाणी. //२//
नयनरम्य दृश्य मनोहारी भासते
स्वच्छंद आभाळ सारे खुलते
निसर्गाची किमया, दिसतें न्यारी
बंद कळीतून , फुल फुलते //३//
रान वेली, झाडे झूडपे
सारेच कसे, नवे दिसतें
प्रसन्न होते,धरणी सारी
स्वागत जणू, पहाटेचं करते//४//
कवी: जनार्दन बाळा गोरे
औरंगाबाद.@जनार्दन ©®
Comments
Post a Comment