Posts

बंद नको पुरे आता

 "बंद,नको पुरे आता" बंद नको पुरे झाले आता  पुऱ्या बंदच्या व्यर्थ बाता   विचार करा आम जनतेचा  बंधुभाव आणि समतेचा !!१!! गटबाजीने कहर केला  कार्यकर्ता हा स्वस्त झाला  ऐका एक सल्ला मोलाचा... विचार करा आम जनतेचा.. बंधुभाव आणि समतेचा. !!२!! कोण रयतेचा कैवारी?  कोण चालवितो हुशारी? प्रश्न नाही एकाचा... विचार करा आम जनतेचा.. बंधुभाव आणि समतेचा...!!३!! कुणाची कुणास फिकीर नाही  जो तो आप आपले पाही  विचार करा गरीब बेकारांचा.. विचार करा आम जनतेचा.. बंधुभाव आणि समतेचा..!!४!! लेखक/कवी/साहित्यिक  जनार्दन बाळा गोरे. छत्रपती संभाजी नगर  @जनार्दन  दिनांक:२४/०८/२०२४.

"क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले"

 "क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले" नाव सावित्रीबाई जोतीराव फुले शिकविल्या मुली शिकविली मुले शिक्षणाचे द्वार मुलींसाठी केले खुले ज्ञान दानाचे पवित्र कार्य केले//१// ज्ञानज्योती पेटविल्या मना मनात तेवत आहे आजही ज्ञानाची वात वाट बिकट होती शिकण्याची सुरुवात केली त्यांनी ज्ञानदानाची//२// घडविली शैक्षणिक क्रांती त्यांनी अशा सावित्रीबाई फुले बहुगुणी  सोसल्या, त्यांनी यातना अनेक होते साठलेले मनात विचार नेक //३// कवी: जनार्दन बाळा गोरे छत्रपती संभाजी नगर. @जनार्दन ©® दिनांक:०३/०१/२०२४

" यश क्रांती"

 "यश क्रांती" मनाचा एकटेपणा जावा म्हणून  करावे सतत काहीतरी काम  सतत कार्यरत राहून गाळावा कष्टाने घाम !!१!! दोन पैसे मिळाले जरी कमी तरी उपाशी राहत नाही कुणी आवर्जून कष्ट करत जावे मिळेल तेंव्हाच जे, जे हवे  !!२!! साष्टांग दंडवत, प्रभात वेळी दुपारी आणि सायंकाळी नित्य आठवावे रूप भगवंताचे सुटतील प्रश्न दीन  दुःखीतांचे !!३!! होत असले शोषण जरी क्षण, क्षण पाहतो तो श्रीहरी मनोमन प्रार्थना त्याच्या चरणी प्रत्येक दिवस लागो सत्कारणी !!४!! ऐकेल हाक, भागेल भूक मिळेल सूख,आपणास कधीतरी लाभेल शांती, उजळेल कांती नव्या युगाची, घडेल यश क्रांती  !!५!! दिनांक:१२/१२/२०२३ कवी/साहित्यिक/ विचारवंत जनार्दन बाळा गोरे छत्रपती संभाजी नगर @जनार्दन

"देवाने सर्वांना समान अधिकार दिले आहेत."

 देवाने सर्वांना समान जगण्याची ताकत दिली आहे. जेंव्हा एखादा श्रीमंत व्यक्ती गरीबाला कमी लेखतो तेंव्हा गरीबाला किती यातना होतात हे तो जानत नाहीं... कारण त्याला त्याच्या श्रीमंतीचा गर्व झालेला असतो. पण हे सत्य त्याला माहित नसते की गरीब हा जरी गरीब असला तरी तो माणुसकी कधीच विसरू शकत नाही. एखाद्या श्रीमंत माणसाचा रस्त्यात अपघात झाला तर सर्वप्रथम सामान्य, गरीब माणूसच पोहचतो. आणि त्याची मदत करतो. त्यावेळी श्रीमंत व्यक्ती देवाचा धावा करत असतो त्याला पैसा अडका नको असतो फक्तं आपणास कुणी तरी वाचवले पाहिजे हाच एकमेव हेतू असतो. पण हे सर्व गरीबाच्या बाबतीत घडत नाही. गरीबाला वाचवायला श्रीमंत व्यक्ती येत नाहीं फक्तं सामान्य माणूसच येतो. जसा पाऊस किती पडेल आणि कधी उघडेल याचा काही नेम नसतो तसच श्रीमंती किती काळ टिकेल आणि पदोन्नती ची दुर्गती कधी होईल हे सांगता येत नाही. तेंव्हा माणसाने आपली मर्यादा न विसरता एकमेकांच्या विरोधात जाणे बंद करून आपसात मतभेद निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.         पद मिळाले म्हणून कुणी राजा होत नाही. पदाची हवा डोक्यात नाहीं तर मना, मनात साठून रा...

"वृध्द आपली संस्कार मार्गदर्शक आशिर्वाद रूपी संपत्ती"

 "वृद्ध आपली संस्कार मार्गदर्शक,आशिर्वाद रूपी संपत्ती"   ही संपत्ती आपण जीवापाड जपली पाहिजे. वृद्धांना वाऱ्यावर न सोडता त्यांची मनापासून सेवा केली पाहिजे. आयुष्य सुरूवातीपासून ते शेवट पर्यंत जगत असताना त्यांना चांगले वाईट अनुभव आलेले असतात त्यातून त्यांनी कसा मार्ग काढला हे ही त्यांनाच ठाऊक असते. सर्व गोष्टींचे ज्ञान आणि  भान त्यांना ठावूक असतें. त्यांचे आशिर्वाद अनमोल आहे त्यांना जपा, त्यांची काळजी घ्या तसेच त्यांची सेवा करा. अनेक संत महंत सांगून गेले ते याच साठी"वृद्ध आपली संपत्ती" वृद्धाश्रम हे फक्त आणि फक्त अनाथांन साठी असावे आपल्या आई वडिलांना ओझे समजू नये. त्यांनी आपल्याला जन्म दिला आणि सांभाळले आपलेही कर्तव्य आहे की त्यांची मनापासून सेवा करावी औषध, पाणी वेळेवर द्यावे. असं केल्यानं प्रत्येक पिढी ही सज्ञानी, संस्कारी, सद्गुणी घडल्याशिवाय राहणार नाही यात तिळमात्र शंका नाही... म्हणून मला सदरील लिखाण लिहावस वाटलं आणि ते मी माझ्या शब्दरूपी डोंगराच्या रांगेतून शोधून काढले आणि आपणासमोर मांडले.. काही शाब्दिक चूक असेल तर समजून लगेच कळवावे  धन्यवाद.. आपलाच कवी/साहित्यिक...

"हाथो की लकिरो में"

 "हाथो की लकिरो में" क्या होता हैं,हातो की लकिरो मे नसीब नहीं बल्की मेहनत होती हैं हाथ पे हाथ धरे बैठं मत जाना क्यो की किस्मत हमेशा सो जाती हैं... क्या होता है, हातो की लकिरो में नसीब नहीं बल्की मेहनत होती हैं. !!१!! सोचने से ना बडलेगी तकदिर कभी व्यर्थ ना जाए समय जरा भी खुबसुरत जीवन चाहते हो अगर तो पार करनी होगी मेहनत की डगर मेहनत से दूर होती पनौती हैं नसीब नहीं बल्की मेहनत होती हैं.. !!२!! जनार्दन बाळा गोरे छत्रपती संभाजी नगर. @Janardan

"पुन्हा बरसेल घन निळा"

 "पुन्हा बरसेल घन निळा" पुन्हा बरसेल घन,निळा घेवून अंगासी रंग काळा दिसेल प्रसन्नआसमंत सारा पुन्हा बरसेल घन निळा. !!१!! आस आपली, ओळखेल तो तृप्त धरणी करेल तो भरून वाहील नदी, ओळा... पुन्हा बरसेल घन निळा  !!२!! होतील सुखी, गरजवंत सारे आनंदाचे चोहीकडे वाहतील वारे सर्वत्र दिसेल आनंदी सोहळा... पुन्हा बरसेल घन निळा !!३!! सृष्टी चक्र फिरेल पुन्हा निळ्या अंबरा, फुटेल पान्हा जाईल निघून सारी अवकळा... पुन्हा बरसेल घन निळा !!४!! कवी/साहित्यिक विचारवंत जनार्दन बाळा गोरे छत्रपती संभाजी नगर @जनार्दन दिनांक १२/०९/२०२३.