"देवाने सर्वांना समान अधिकार दिले आहेत."
देवाने सर्वांना समान जगण्याची ताकत दिली आहे.
जेंव्हा एखादा श्रीमंत व्यक्ती गरीबाला कमी लेखतो तेंव्हा गरीबाला किती यातना होतात हे तो जानत नाहीं... कारण त्याला त्याच्या श्रीमंतीचा गर्व झालेला असतो. पण हे सत्य त्याला माहित नसते की गरीब हा जरी गरीब असला तरी तो माणुसकी कधीच विसरू शकत नाही.
एखाद्या श्रीमंत माणसाचा रस्त्यात अपघात झाला तर सर्वप्रथम सामान्य, गरीब माणूसच पोहचतो. आणि त्याची मदत करतो. त्यावेळी श्रीमंत व्यक्ती देवाचा धावा करत असतो त्याला पैसा अडका नको असतो फक्तं आपणास कुणी तरी वाचवले पाहिजे हाच एकमेव हेतू असतो.
पण हे सर्व गरीबाच्या बाबतीत घडत नाही. गरीबाला वाचवायला श्रीमंत व्यक्ती येत नाहीं फक्तं सामान्य माणूसच येतो.
जसा पाऊस किती पडेल आणि कधी उघडेल याचा काही नेम नसतो तसच श्रीमंती किती काळ टिकेल आणि पदोन्नती ची दुर्गती कधी होईल हे सांगता येत नाही. तेंव्हा माणसाने आपली मर्यादा न विसरता एकमेकांच्या विरोधात जाणे बंद करून आपसात मतभेद निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.
पद मिळाले म्हणून कुणी राजा होत नाही. पदाची हवा डोक्यात नाहीं तर मना, मनात साठून राहीली पाहिजे.
माणसाने आपला भूतकाळ (गतकाळ)
कधीही विसरु नये कारण भूतकाळाची
पुनरावृत्ती कधीही होऊ शकते.
त्यामुळे कुणीही कुणाला कमी न ले खता सर्वांना समान वागणूक दिली पाहिजे, तरच गरीब माणसाला न्याय मिळेल. अन्यथा त्याच गरीबाची हाय (शाप) लागून जैसे थे पूर्वीसारखे होईल.
धन्यवाद.
(सदरील लेख काल्पनिक असून त्यात वास्तवता असेल तर तो केवळ एक योगायोग समजावा.
दिनांक:१३/१०/२०२३
कवी/लेखक/विचारवंत
जनार्दन बाळा गोरे
छत्रपती संभाजी नगर.
@जनार्दन
Comments
Post a Comment