"वृध्द आपली संस्कार मार्गदर्शक आशिर्वाद रूपी संपत्ती"
"वृद्ध आपली संस्कार मार्गदर्शक,आशिर्वाद रूपी संपत्ती"
ही संपत्ती आपण जीवापाड जपली पाहिजे. वृद्धांना वाऱ्यावर न सोडता त्यांची मनापासून सेवा केली पाहिजे.
आयुष्य सुरूवातीपासून ते शेवट पर्यंत जगत असताना त्यांना चांगले वाईट अनुभव आलेले असतात त्यातून त्यांनी कसा मार्ग काढला हे ही त्यांनाच ठाऊक असते. सर्व गोष्टींचे ज्ञान आणि
भान त्यांना ठावूक असतें.
त्यांचे आशिर्वाद अनमोल आहे
त्यांना जपा, त्यांची काळजी घ्या तसेच त्यांची सेवा करा. अनेक संत महंत सांगून गेले ते याच साठी"वृद्ध आपली संपत्ती" वृद्धाश्रम हे फक्त आणि फक्त अनाथांन साठी असावे आपल्या आई वडिलांना ओझे समजू नये. त्यांनी आपल्याला जन्म दिला आणि सांभाळले आपलेही कर्तव्य आहे की त्यांची मनापासून सेवा करावी औषध, पाणी वेळेवर द्यावे. असं केल्यानं प्रत्येक पिढी ही सज्ञानी, संस्कारी, सद्गुणी घडल्याशिवाय राहणार नाही यात तिळमात्र शंका नाही...
म्हणून मला सदरील लिखाण लिहावस वाटलं आणि ते मी माझ्या शब्दरूपी डोंगराच्या रांगेतून शोधून काढले आणि आपणासमोर मांडले.. काही शाब्दिक चूक असेल तर समजून लगेच कळवावे
धन्यवाद..
आपलाच कवी/साहित्यिक विचारवंत मित्र
जनार्दन बाळा गोरे
छत्रपती संभाजी नगर
@जनार्दन
दिनांक:०८/१०/२०२३.
Comments
Post a Comment