बंद नको पुरे आता

 "बंद,नको पुरे आता"

बंद नको पुरे झाले आता 

पुऱ्या बंदच्या व्यर्थ बाता 

 विचार करा आम जनतेचा 

बंधुभाव आणि समतेचा !!१!!


गटबाजीने कहर केला 

कार्यकर्ता हा स्वस्त झाला 

ऐका एक सल्ला मोलाचा...

विचार करा आम जनतेचा..

बंधुभाव आणि समतेचा. !!२!!


कोण रयतेचा कैवारी? 

कोण चालवितो हुशारी?

प्रश्न नाही एकाचा...

विचार करा आम जनतेचा..

बंधुभाव आणि समतेचा...!!३!!


कुणाची कुणास फिकीर नाही 

जो तो आप आपले पाही 

विचार करा गरीब बेकारांचा..

विचार करा आम जनतेचा..

बंधुभाव आणि समतेचा..!!४!!


लेखक/कवी/साहित्यिक 


जनार्दन बाळा गोरे.

छत्रपती संभाजी नगर 

@जनार्दन 


दिनांक:२४/०८/२०२४.

Comments

Popular posts from this blog

"पासिंग नंबर"

"मौन निमंत्रण"