"क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले"

 "क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले"


नाव सावित्रीबाई जोतीराव फुले

शिकविल्या मुली शिकविली मुले

शिक्षणाचे द्वार मुलींसाठी केले खुले

ज्ञान दानाचे पवित्र कार्य केले//१//


ज्ञानज्योती पेटविल्या मना मनात

तेवत आहे आजही ज्ञानाची वात

वाट बिकट होती शिकण्याची

सुरुवात केली त्यांनी ज्ञानदानाची//२//


घडविली शैक्षणिक क्रांती त्यांनी

अशा सावित्रीबाई फुले बहुगुणी

 सोसल्या, त्यांनी यातना अनेक

होते साठलेले मनात विचार नेक //३//


कवी: जनार्दन बाळा गोरे छत्रपती संभाजी नगर.

@जनार्दन

©®

दिनांक:०३/०१/२०२४

Comments