"पुन्हा बरसेल घन निळा"
"पुन्हा बरसेल घन निळा"
पुन्हा बरसेल घन,निळा
घेवून अंगासी रंग काळा
दिसेल प्रसन्नआसमंत सारा
पुन्हा बरसेल घन निळा. !!१!!
आस आपली, ओळखेल तो
तृप्त धरणी करेल तो
भरून वाहील नदी, ओळा...
पुन्हा बरसेल घन निळा !!२!!
होतील सुखी, गरजवंत सारे
आनंदाचे चोहीकडे वाहतील वारे
सर्वत्र दिसेल आनंदी सोहळा...
पुन्हा बरसेल घन निळा !!३!!
सृष्टी चक्र फिरेल पुन्हा
निळ्या अंबरा, फुटेल पान्हा
जाईल निघून सारी अवकळा...
पुन्हा बरसेल घन निळा !!४!!
कवी/साहित्यिक विचारवंत
जनार्दन बाळा गोरे
छत्रपती संभाजी नगर
@जनार्दन
दिनांक १२/०९/२०२३.
Comments
Post a Comment