Posts

Showing posts from July, 2022

"पर्यावरण"

 विषय: पर्यावरण शीर्षक: निसर्ग डोंगर, टेकड्या पाहू करू वृक्ष संवर्धन वृक्षांचे रोपण करु पर्यावरण रक्षण//१// पावसाची रिपरिप सुरू हंगाम खरीप सर सर जलधारा मंद, मंद धुंद वारा//२// लहान सहान सारे कुदळ फावडे घ्यारे खत पाणी वृक्षा द्यारे//३// पशु पक्षी, वनचरे वनात त्यांचीच घरे हवा मिळेल छानशी जमेल गट्टी वृक्षांशी//४// शुद्ध पाणी, शुद्ध वायु वाढेल मानवी आयु पर्यावरण रक्षण ठेऊ ध्यानी क्षण, क्षण//५// दिनांक ०५/०६/२०२१ कवी: जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद. @जनार्दन.

"मरता हुआ जवान"

  विषय:"मरता हुआ जवान" सरहद्द पर, लढते, लढते कह गया "मरता हुआ जवान" देश के खातीर मिट रहा हुं हो रहा हुं देश पर कुर्बान !!१!! कर दो विदा अब मुझे बित रही देखो अब शाम छोड कर पीछे, खुशिया तमाम हो रहा हुं देश पर कुर्बांन.. !!२!! वतन हमारा, तुम संभालो जीत ना पाए शत्रु शैतान गालो भारत माता का गुणगान.. हो रहा हुं देश पर कूर्बान...!!३!! मैं फिर दुबारा जनम लुंगा मातृभूमि को करने अर्पण प्राण भारत माता को आखरी प्रणाम.. हो रहा हुं देश पर कुर्बान...!!४!! कवि: जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद. @जनार्दन

"कामगार"

 "कामगार" कष्ट करतो लावून प्राण पणाला इथे मात्र मोल नाहीं त्यांचे कुणाला मोजून मापून पगार तोडका सतत उडतो महागाईचा भडका  //१// लेकरं आहेत ठेवून आशा त्यांच्याही आहेत बऱ्याच अपेक्षा कामगारांची सतत होतें उपेक्षा मोठा नाहीं कुणी, त्यांच्या पेक्षा //२// परंपरा ही चालत आली फजिती ही कामगाराची झाली जो, तो नजर ठेवतो कामावर कामगारांचा मात्र विश्वास घामावर //३// आयुष्य ढळते,राबताना सारे आशेवर जगतात, कामगार बिचारे त्यांचीही आहेत, स्वप्नं अनेक मनाला बसतात चटके कैक //४// कष्टाला फळ, हाताला बळ कामगारांचा कुणी, करू नये छळ सरळ सोपे, जगणे व्हावे त्यांचे शोषण होवू नये, कधी कामगारांचे //५//       कवी: जनार्दन बाळा गोरे. संभाजीनगर... दिनांक : 21/07/2022

"धनगर राजा"

 धनगर समाजावर आधारीत माझी स्वरचित नविन रचना. शिर्षक:"धनगर राजा" मी धनगर, धनगर मेंढरांचा राजा मेंढरं चारतो, चारतो माळावरं पारख ठेवतो, ठेवतो मेंढरांवर जीव ओवाळून टाकतो त्यांच्यावर //१// माझी मेंढरं लयी, लयी छान जशी मोत्याची, मोत्याची हो खाण भाकरी घेऊनी, घेऊनी हातावरी घोंगडी घेऊनी, घेऊनी खांद्यावरी //२// काठी हाती आहे मोठी गाणं सुंदर गातो ओठी माझ्या जोडीला, माझा मोती माझ्या मेंढरांचा आहे सोबती //३// माझी मेंढरं माझं धन त्यांच्यामुळे ताठ माझी मान काळी, पांढरी मेंढर माझी मऊ लोकर  अंगी साजी  //४// तीन, चार दिवसांचं जन्मलेलं चालून, चालून दमलेलं कोकरू उचलून मानेवरी परतून येतो, आखरावरी //५// कवी/साहित्यिक, विचारवंत श्री. जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद. @जनार्दन दिनांक:१८/०७/२०२२

"गणपती गजानना"

 "गणपती गजानना" विघ्नेश्वर, गणपती, गजानना शिव सुता, पार्वती नंदना होतो भक्तीत, तुझ्या लिन गातो तुझी, भक्ती वंदना //१// वेदना मनाच्या, कर दूर मनात वाहे भक्तीचा पूर दुःखे मिटावी हिच कामना गातो तुझी, भक्ती वंदना. //२// बुध्दी,शुद्धी कर आता तूझ्या चरणी, ठेवतो माथा दूर कर देवा साऱ्या वेदना गातो तुझी,भक्ती वंदना  //३//  प्रथम नमन तुझीया पाया गणपती, गजानना, गणराया तूझ्या नामाची, नित्य प्रार्थना गातो तुझी, भक्ती वंदना //४// दिनांक:१६/०७/२०२२ कवी: जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद. @जनार्दन