"कामगार"
"कामगार"
कष्ट करतो लावून प्राण पणाला
इथे मात्र मोल नाहीं त्यांचे कुणाला
मोजून मापून पगार तोडका
सतत उडतो महागाईचा भडका //१//
लेकरं आहेत ठेवून आशा
त्यांच्याही आहेत बऱ्याच अपेक्षा
कामगारांची सतत होतें उपेक्षा
मोठा नाहीं कुणी, त्यांच्या पेक्षा //२//
परंपरा ही चालत आली
फजिती ही कामगाराची झाली
जो, तो नजर ठेवतो कामावर
कामगारांचा मात्र विश्वास घामावर //३//
आयुष्य ढळते,राबताना सारे
आशेवर जगतात, कामगार बिचारे
त्यांचीही आहेत, स्वप्नं अनेक
मनाला बसतात चटके कैक //४//
कष्टाला फळ, हाताला बळ
कामगारांचा कुणी, करू नये छळ
सरळ सोपे, जगणे व्हावे त्यांचे
शोषण होवू नये, कधी कामगारांचे //५//
कवी: जनार्दन बाळा गोरे. संभाजीनगर...
दिनांक : 21/07/2022
Comments
Post a Comment