"पर्यावरण"
विषय: पर्यावरण
शीर्षक: निसर्ग
डोंगर, टेकड्या पाहू
करू वृक्ष संवर्धन
वृक्षांचे रोपण करु
पर्यावरण रक्षण//१//
पावसाची रिपरिप
सुरू हंगाम खरीप
सर सर जलधारा
मंद, मंद धुंद वारा//२//
लहान सहान सारे
कुदळ फावडे घ्यारे
खत पाणी वृक्षा द्यारे//३//
पशु पक्षी, वनचरे
वनात त्यांचीच घरे
हवा मिळेल छानशी
जमेल गट्टी वृक्षांशी//४//
शुद्ध पाणी, शुद्ध वायु
वाढेल मानवी आयु
पर्यावरण रक्षण
ठेऊ ध्यानी क्षण, क्षण//५//
दिनांक ०५/०६/२०२१
कवी: जनार्दन बाळा गोरे
औरंगाबाद.
@जनार्दन.
Comments
Post a Comment