"धनगर राजा"

 धनगर समाजावर आधारीत माझी स्वरचित नविन रचना.

शिर्षक:"धनगर राजा"

मी धनगर, धनगर मेंढरांचा राजा

मेंढरं चारतो, चारतो माळावरं

पारख ठेवतो, ठेवतो मेंढरांवर

जीव ओवाळून टाकतो त्यांच्यावर //१//


माझी मेंढरं लयी, लयी छान

जशी मोत्याची, मोत्याची हो खाण

भाकरी घेऊनी, घेऊनी हातावरी

घोंगडी घेऊनी, घेऊनी खांद्यावरी //२//


काठी हाती आहे मोठी

गाणं सुंदर गातो ओठी

माझ्या जोडीला, माझा मोती

माझ्या मेंढरांचा आहे सोबती //३//


माझी मेंढरं माझं धन

त्यांच्यामुळे ताठ माझी मान

काळी, पांढरी मेंढर माझी

मऊ लोकर  अंगी साजी  //४//


तीन, चार दिवसांचं जन्मलेलं

चालून, चालून दमलेलं

कोकरू उचलून मानेवरी

परतून येतो, आखरावरी //५//


कवी/साहित्यिक, विचारवंत

श्री. जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद.

@जनार्दन

दिनांक:१८/०७/२०२२

Comments

Popular posts from this blog

"पासिंग नंबर"

"मौन निमंत्रण"