"गणपती गजानना"
"गणपती गजानना"
विघ्नेश्वर, गणपती, गजानना
शिव सुता, पार्वती नंदना
होतो भक्तीत, तुझ्या लिन
गातो तुझी, भक्ती वंदना //१//
वेदना मनाच्या, कर दूर
मनात वाहे भक्तीचा पूर
दुःखे मिटावी हिच कामना
गातो तुझी, भक्ती वंदना. //२//
बुध्दी,शुद्धी कर आता
तूझ्या चरणी, ठेवतो माथा
दूर कर देवा साऱ्या वेदना
गातो तुझी,भक्ती वंदना //३//
प्रथम नमन तुझीया पाया
गणपती, गजानना, गणराया
तूझ्या नामाची, नित्य प्रार्थना
गातो तुझी, भक्ती वंदना //४//
दिनांक:१६/०७/२०२२
कवी: जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद.
@जनार्दन
Comments
Post a Comment