"विचारांचे मोती"
"शब्दांचे मोती" मनाच्या यज्ञात, विचारांची आहुती पेरतो क्षणोक्षणी, शब्दांचे मोती वाचन संस्कार, चालवून मती पेरतो क्षणोक्षणी, शब्दांचे मोती //१// विचारांचा खजिना, मनात साठवून जोडून शब्द, एक, एक आठवून तेवत ठेवून, विचारांच्या वाती पेरतो क्षणोक्षणी, शब्दांचे मोती//२// मुक्त द्वार , विचारांना खुले वाहून मनातली विचार फुले देऊन शब्दांना, तीव्र गती पेरतो क्षणोक्षणी शब्दांचे मोती//३// अनुभव शब्दरुपात, नित्य मांडतो चालू घडामोडी, कथन करतो जीवन अवघे, सारेच आशावादी पेरतो क्षणोक्षणी, शब्दांचे मोती //४// दिनांक:२९/०३/२०२२. कवी/लेखक/विचारवंत जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद. @जनार्दन