"विचारांचे मोती"
"शब्दांचे मोती"
मनाच्या यज्ञात, विचारांची आहुती
पेरतो क्षणोक्षणी, शब्दांचे मोती
वाचन संस्कार, चालवून मती
पेरतो क्षणोक्षणी, शब्दांचे मोती //१//
विचारांचा खजिना, मनात साठवून
जोडून शब्द, एक, एक आठवून
तेवत ठेवून, विचारांच्या वाती
पेरतो क्षणोक्षणी, शब्दांचे मोती//२//
मुक्त द्वार , विचारांना खुले
वाहून मनातली विचार फुले
देऊन शब्दांना, तीव्र गती
पेरतो क्षणोक्षणी शब्दांचे मोती//३//
अनुभव शब्दरुपात, नित्य मांडतो
चालू घडामोडी, कथन करतो
जीवन अवघे, सारेच आशावादी
पेरतो क्षणोक्षणी, शब्दांचे मोती //४//
दिनांक:२९/०३/२०२२.
कवी/लेखक/विचारवंत
जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद.
@जनार्दन
Comments
Post a Comment