"ह्याला कविता ऐसे नाव"
"ह्याला कविता ऐसे नाव"
मनात उतरतो, शब्दांतील भाव
जशी पैलतिरी पोहोचते नाव
आपला भासतो, हरेक गाव
कळून येतो प्रत्येक स्वभाव
"ह्याला कविता, ऐसे नाव ||१||
मंदधुंद वारा, मोराचा पिसारा
कोकिळेची गाणी,खळाळते पाणी
हलनारी पाने, हिरवीगार वने
सोसतो कुणी,कष्टांचे घाव
ह्याला कविता ऐसे नाव ||२||
शब्दांचा खेळ, प्रहराची वेळ
बरसणारा पाऊस,गोड हापूस
उसळत्या लाटा, पळणाऱ्या वाटा
समजतो कुणी स्वतःलाच राव
ह्याला कविता ऐसे नाव ||३||
कुणाची भक्ती, मिळवण्या मुक्ती
शोध शब्दांचा, जागर जाणिवांचा
रीती रिवाज, हरवलेला आवाज
कुणी जगतो, मोठे करण्या नाव
ह्याला कविता ऐसे नाव ||४||
दिनांक २१/०३/२०२२
कवी: जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद.
@जनार्दन
Comments
Post a Comment