"पासिंग नंबर"

" पासिंग नंबर " 

एम एच झिरो एक

दिसते या नंबरची गाडी नेक

एम एच झिरो दोन

गाडीवर सिट्स बसवा फक्त दोन //१//

एम एच झिरो तीन

व्यवस्थित बंद करा गाडीची कॅबिन

एम एच झिरो चार

बसतील सोबत दोस्त, यार//२//

एम एच झिरो पाच

कुणालाही ओव्हरटेक करु नका उगाच

एम एच झिरो सहा

चालवताना गाडी समोर निट पाहा//३//

एम एच झिरो सात

चालवताना गाडी , करु नये फोनवर बात

एम एच झिरो आठ

व्यवस्थित बसा नाहीतर दुखेल पाठ//४//

एम एच झिरो नऊ

गाडी चालवताना काहीही नका पिऊ

एम एच दहा

समोरील सिग्नल पाहा//५//

एम एच अकरा

उगाच गाडीवर मारू नका चकरा

एम एच बारा,

चालवताना गाडी, हेल्मेट वापरा

नाहीतर तुटेल, जीवनाचा फेरा//६//

कवी: जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद.

@जनार्दन


Comments

Popular posts from this blog

"मौन निमंत्रण"