"कार्यकर्ता"
"कार्यकर्ता"
राजकारणात कुणाला कुणाचा
काही ताळमेळ नसतो
बळीचा बकरा नेहमी
कार्यकर्ताच सदा असतो !!१!!
सभेला गर्दी जमवतो
काय हवं नको पाहतो
साहेबाला देवून खुर्ची
स्वतः मात्र उभा राहतो !!२!!
साहेबांची नुसतीच आश्वासने
कार्यकर्ता ऐकतो विश्वासाने
साहेबांवर जीवापाड प्रेम
दरवेळी हूकतो तिकिटांचा नेम !!३!!
आसं ठेवून आपल्या मनात
कार्यकर्त्यांचे जीवन पाण्यात
विजयाचा शिलेदार कार्यकर्ता
निवडणुकीचा आधार कार्यकर्ता !!४!!
संधी द्यावी कार्यकर्त्याला
जो वाढवतो नित्य पक्षाला
पक्ष श्रेष्ठींना असावी किंमत
कारण कार्यकर्ताच पक्षाची हिंमत !!५!!
कवी: जनार्दन बाळा गोरे
छत्रपती संभाजी नगर.
दिनांक:२५/०७/२०२३
Comments
Post a Comment