"आम्हीं वारकरी"
विषय: "आम्ही वारकरी"
आम्ही वारकरी ! चंद्रभागे तीरी
दंग भजनात ! पांडुरंगा !!१!!
दुःखे पचवून ! मन संसारात !
मदतीचा हात ! माथ्यावर !!२!!
डोळे पाणावले ! तुला विनविले !
धाव मायबापा ! बा विठ्ठला !!३!!
आस दर्शनाची ! हिच एक आशा
तोड भय पाशा ! क्षणार्धात !!४!!
मार्ग जीवनाचा ! कर सुखकर
तुझे उपकार ! सदोदित !!५!!
ऐक माझी आता ! जीवनाची व्यथा !
टेकवितो माथा ! चरणाशी !!६!!
कवी/साहित्यिक/ विचारवंत
जनार्दन बाळा गोरे
छ्त्रपती संभाजी नगर.
@जनार्दन
Comments
Post a Comment