Posts

Showing posts from July, 2023

"कार्यकर्ता"

 "कार्यकर्ता" राजकारणात कुणाला कुणाचा  काही  ताळमेळ नसतो बळीचा बकरा नेहमी कार्यकर्ताच सदा असतो !!१!! सभेला गर्दी जमवतो काय हवं नको पाहतो साहेबाला देवून खुर्ची स्वतः मात्र उभा राहतो !!२!! साहेबांची नुसतीच आश्वासने कार्यकर्ता ऐकतो विश्वासाने साहेबांवर जीवापाड प्रेम दरवेळी हूकतो तिकिटांचा नेम !!३!! आसं ठेवून आपल्या मनात कार्यकर्त्यांचे जीवन पाण्यात विजयाचा शिलेदार कार्यकर्ता निवडणुकीचा आधार कार्यकर्ता  !!४!! संधी द्यावी कार्यकर्त्याला जो वाढवतो नित्य पक्षाला पक्ष श्रेष्ठींना असावी किंमत कारण कार्यकर्ताच पक्षाची  हिंमत !!५!! कवी: जनार्दन बाळा गोरे छत्रपती संभाजी नगर. दिनांक:२५/०७/२०२३

"आम्हीं वारकरी"

विषय: "आम्ही वारकरी" आम्ही वारकरी ! चंद्रभागे तीरी दंग भजनात ! पांडुरंगा !!१!! दुःखे पचवून ! मन संसारात ! मदतीचा हात ! माथ्यावर  !!२!! डोळे पाणावले ! तुला विनविले ! धाव मायबापा ! बा विठ्ठला  !!३!! आस दर्शनाची ! हिच एक आशा तोड भय पाशा ! क्षणार्धात  !!४!! मार्ग जीवनाचा ! कर सुखकर तुझे उपकार ! सदोदित  !!५!!   ऐक माझी आता ! जीवनाची व्यथा !     टेकवितो माथा ! चरणाशी  !!६!!      कवी/साहित्यिक/ विचारवंत    जनार्दन बाळा गोरे छ्त्रपती संभाजी नगर. @जनार्दन