"वारी चालली, चालली"
"वारी चालली चालली"
वारी चालली,चालली
वाटे खेळत पावली
ओढ विठू माउली
वारी चालली,चालली !!१!!
टाळ मृदंग गजर
फुटे अंबरा पाझर
दिंडी मार्गस्थ जाहली...
वारी चालली, चालली !!२!!
जगी आनंद वेगळा
वारी कौतुक सोहळा
लागे भक्तीचा लळा
जाती भुलून अवकळा
सोबत मायेची सावली
वारी चालली, चालली !!३!!
ओढ मनास लागली
भेटेल विठ्ठल माऊली
सोबत मायेची सावली...
वारी चालली, चालली. !!४!!
कवी: जनार्दन बाळा गोरे
छत्रपती संभाजी नगर.
@janardan
दिनांक:२०/०६/२०२३
Comments
Post a Comment