"मकर संक्रांत"


"मकर संक्रांत"

सण संक्रांतीचा,येतो आनंद घेवून

गोडवा शब्दांचा मनात साठवून

शुद्ध विचार,शुद्ध ठेऊन मन

मोठ्या मनाने वाटावे तिळाचे कण !!१!!


शब्द गोड, सतत वाटावे

तीळ, गुळासारखे ,

होणार नाही कुणी

खऱ्या प्रेमास पारखे !!२!!


गोडवा राहील सदैव

आपल्या जीवनात

जेंव्हा साठतील शब्द

गोड मना मनात !!३!!


दूर लोटून, एकेक शब्द कडवा

चाखू सारे मकर संक्रांतीचा गोडवा

आनंदाने तेवत ठेवू,दीप ज्योती

जपू माणुसकी, जिव्हाळ्याची नाती !!४!!


दिनांक:१५/०१/२०२३


कवी/साहित्यिक/विचारवंत

जनार्दन बाळा गोरे छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद)

@जनार्दन



कवी: जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद

Comments

Popular posts from this blog

"पासिंग नंबर"

"मौन निमंत्रण"