"नविन वर्ष"
"नविन वर्ष"
नविन वर्ष, संकल्प नवा
स्वप्नं नवे, आदर्श नवा
विचार नवे, एकांत नवा
उमेद नवी, काळ नवा..!!१!!
नविन वर्ष, हर्ष नवा
जीवना सोबत,संघर्ष नवा
जगण्याचा खेळ, हा जुना
सजून येतो, पुन पुन्हा !!२!!
आनंद जीवनी, सजली अवनी
निसर्गाची करणी, नारळात पाणी
पुन्हा कापणी, पुन्हा लावणी
अशीच चालेल, जीवनाची कहाणी !!३!!
नविन वर्षाच्या, नविन हर्षाच्या
शुभेच्छा सर्वांना निरंतर देतो
जीवनात समाधान ज्ञान वाढो
साहित्य लेखनाचे व्यसन जडो !!४!!
कवी/साहित्यिक विचारवंत
जनार्दन बाळा गोरे
औरंगाबाद.@जनार्दन
Comments
Post a Comment