"स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव"

 विषय  : "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव"

काव्य प्रकार: मुक्तछंद

शीर्षक:"स्वातंत्र्य दिवाळी"

आपलाच भारत, आपुलेच जन

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सण

कुठं उपोषण, कुठे कुपोषण

वाढती महागाई, आणि प्रदुषण !!१!!


आजही बेरोजगारी, आणि बेकारी

मग काय कामाची असून हुशारी

वरचेवर भरती होई आपो आप

सोसतो झळा, बेकारीच्या निष्पाप  !!२!!

अनेक गोष्टींचे, व्हावे निरसन 

करुन सारे विचार मंथन

भारतात आपल्या, घडावे परिवर्तन

बेकारास नोकरी, द्यावी आवर्जुन !!३!!


बेकार किती, नोकरीस किती

याची करावी, नित्य गणती

भुकेल्यास भाकरी,गरजवंतास नोकरी

हिच स्वातंत्र्याची ठरेल सीमा खरी !!४!!


अमृत महोत्सव होईल साजरा खरा

जेंव्हा येईल सुख गरीबा घरा

 निनादेल स्वातंत्र्याची आनंद भूपाळी

खरी साजरी होईल स्वातंत्र्य दिवाळी !!५!!


अमृत महोत्सव हा स्वातंत्र्याचा

आहे हक्क प्रत्येक भारतीय माणसाचा

देशास नेण्यास पुढे नित्य श्रमावे

भारत भूमि पुढें नतमस्तक व्हावे. !!६!!


    कवी/साहित्यिक/विचारवंत/लेखक

 

श्री. जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद.

@जनार्दन 

दिनांक १५/०८/२०२२

Comments

Popular posts from this blog

"पासिंग नंबर"

"मौन निमंत्रण"