"राजकारण"
"राजकारण"
आता राजकारण सोडा
साऱ्यांनी विठ्ठलाशी नाते जोडा
राजकारणी, एकाच माळेचे मणी
एकाच विषयावर, धुतात धुणी//१//
राजकारण दिशाहीन झाले
आम जनतेचे मात्र, नुकसान झाले
असो कोणताही, पक्ष संघटना
"राजकारण"नाही मतलबा विना //२//
सोसणारे सोसतात, पोसणारे पोसतात
पाहून मजा हसणारे, रिकामे हसतात
जननेता फक्त नावाला असतो
गरीब कार्यकर्ता, मात्र प्रचाराला फसतो//३//
आपण आपले, रहावे नीट
विठ्ठला भेटावे, करून पायपीट
होतो शपथ विधी वेळी अवेळी
विचित्र वाटते राजकारणाची खेळी//४//
मनधरणी केली जाते कुणाची
माहिती हवी असते क्षणा क्षणाची
खुर्चीची लालसा, सुटत नाही कधी
बरी होत नाही राजकारणाची व्याधी //५//
कवी: जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद.
@जनार्दन.
आपलाच कवी मित्र
जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद.
Comments
Post a Comment