"आशेची मनपाखरे"

 "आशेची मनपाखरे"

आशेची मनपाखरे,उडती दाहीदिशा

कुठे मिळतोआसरा कुठे होतो हशा  

कधी शब्दांचा लाभतो गोड गोडवा,

मनास कधी तोच लागतो कडवा //१//


मनपाखरे आशेची, पाहे वाटा सुखाच्या

हिंडून फिरून येती दरीत काळोखाच्या

सुन्दर स्वप्नांच्या दुनियेत रमून पाखरं

जुन्या नव्या आठवणी करतं साजरं //२//


वादळ वाऱ्याची, नसे तमा पाखरांना

दमुन भागून सोसती अवघड यातना

सागराच्या लाटेसम जगणं हे पाखरांच

 किनारी धाव, करून सोनं अपेक्षांचं//३//


मनपाखरांची सभा, मनाच्या अंधारात

घेण्या उंच भरारी मन अंतरात

दुनियेच्या मोहजालात अडकती बिचारे

स्वतःच स्वतःशी लढती मन पाखरे //४//


दिनांक:१९/०५/२०२२


कवी/लेखक/विचारवंत

जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद.

@जनार्दन.

Comments

Popular posts from this blog

"पासिंग नंबर"

"मौन निमंत्रण"