"आशेची मनपाखरे"
"आशेची मनपाखरे" आशेची मनपाखरे,उडती दाहीदिशा कुठे मिळतोआसरा कुठे होतो हशा कधी शब्दांचा लाभतो गोड गोडवा, मनास कधी तोच लागतो कडवा //१// मनपाखरे आशेची, पाहे वाटा सुखाच्या हिंडून फिरून येती दरीत काळोखाच्या सुन्दर स्वप्नांच्या दुनियेत रमून पाखरं जुन्या नव्या आठवणी करतं साजरं //२// वादळ वाऱ्याची, नसे तमा पाखरांना दमुन भागून सोसती अवघड यातना सागराच्या लाटेसम जगणं हे पाखरांच किनारी धाव, करून सोनं अपेक्षांचं//३// मनपाखरांची सभा, मनाच्या अंधारात घेण्या उंच भरारी मन अंतरात दुनियेच्या मोहजालात अडकती बिचारे स्वतःच स्वतःशी लढती मन पाखरे //४// दिनांक:१९/०५/२०२२ कवी/लेखक/विचारवंत जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद. @जनार्दन.