"सुखाचे दिवस, किती दूर"

 "सुखाचे दिवस, किती दूर"

विचाराने मनास, लागते हुर हुर

सुखाचे दिवस, अजून कीती दूर

डोळ्यांना येतो, आसवांचा पूर...

सुखाचे दिवस, अजून किती दूर...||१||


सोसले आजवर, अतोनात हाल

समजेना कुणाला, कष्टांचे मोल

यातना सहन, केल्यात भरपूर...

सुखाचे दिवस, अजून किती दूर.. ||२||


कुणाला कुणाचा, नाही ताळमेळ

चालेल कुठवर, जगण्याचा खेळ

जागोजागी निंदकांचा,भरतो बाजार..

सुखाचे दिवस, अजून किती दूर...||३||


बिकट वाटते, संसाराची वाट

दिसेल कधी, सुखाची पहाट

नको वाटते, असे जगणे लाचार..

सुखाचे दिवस अजून किती दूर..||४||


गलत हातात, येते जेंव्हा सत्ता

कितीही कुटा, कष्टांचा खलबत्ता

माजते मनात विचारांचे काहूर....

सुखाचे दिवस,अजून किती दूर...||५||


दिनांक:२९/०४/२०२२.

कवी, लेखक, विचारवंत

जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद.

@जनार्दन.

Comments

Popular posts from this blog

"पासिंग नंबर"

"मौन निमंत्रण"