"अभिमान सोडा, माणसे जोडा"
"अभिमान सोडा, माणसे जोडा"
किती आले,किती गेले
छाप आपली, सोडून गेले
टिकला नाही, कुणी निरंतर
गेला टाकून, चड्डी, धोतर ||१||
अभिमान सोडा, माणसे जोडा
मरगळ जुनी, मनातून काढा
जगू नका, फक्त गरजेखातर..
टिकला नाही, कुणी निरंतर..
गेला टाकून, चड्डी धोतर ||२||
चाली रिती, साऱ्या सोडून
विचार वाईट, मनातून काढून
ज्ञान संपादन, एकच जागर..
टिकला नाही, कुणी निरंतर...
गेला टाकून, चड्डी धोतर...||३||
दिनक्रम आपला, एकच ठेवा
विना सेवा, मिले ना मेवा
श्रेष्ठ आपली, कष्टाची भाकर...
टिकला नाही, कुणी निरंतर...
गेला टाकून चड्डी धोतर...||४||
वेळचा सदुपयोग, नित्य व्हावा
जीवनाचा हेतू, सार्थ ठरावा
मनात असावा, दयेचा सागर...
टिकला नाही, कुणी निरंतर..
गेला टाकून, चड्डी धोतर...||५||
दिनांक:२५/०४/२०२२
कवी/साहित्यिक/विचारवंत
जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद.
@जनार्दन.
Comments
Post a Comment