"वेल्डर"
"वेल्डर". ११/०२/२०२२.
अरे संसार, संसार
जशी वेल्डिंग जॉबवर
आधी हाताला चटके
पडते पायांवर स्पॅटर//१//
पडतो डोळ्यांवर ताण
सतत दुखते हो मान
करावे लागते सारे सहन
वितभर या पोटा कारणं//२//
विसरावी लागते भुक तहान
विचारात पडलो करावे काय?
सुचत नाही, वेल्डिंग शिवाय
करावा काय, दुसरा उपाय //३//
कष्टाविना मिळत नाही फळं
म्हणून सोसावी लागते कळ
होते गरम वेल्डिंग होल्डर
सोसून चटके, जगतो वेल्डर//४//
मोबदला कामाचा, मिळतो कमी
संसारात त्यांच्या नित्याचीच सुनामी
हाती नसतो पुरेसा पैसा अडका
कायम घरात असतो कडका
मग द्यावा कसा भाजीला तडका//५//
वेल्डरच्या जीवनाशी निगडीत स्वरचित रचना.
@जनार्दन
कवी: जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद.🙏🙏
Comments
Post a Comment