"ब्रेक"

 "ब्रेक"

गाडीच्या वेगाला,धावत्या मार्गाला

 थकलेल्या हातांना, शिणलेल्या मनाला

परिश्रमाने,थकलेल्या प्रत्येक जणाला

ब्रेक हा हवाच असतो जगण्याला //१//

 

ब्रेकचे फायदे असतात अनेक

ब्रेंकणे वाचतात जीव हर एक

जेंव्हा होतो,अनिष्ट प्रथांचा उद्रेक

कुठेतरी,कधीतरी बसतो त्यांना ब्रेक//२//

जीवनाला मिळतो, सेवेतून ब्रेक

ब्रेकचे असतात,प्रकार अनेक

सर्वात उत्तम आहे मनाचा ब्रेक

मनाच्या ब्रेकचे फायदे असतात अनेक//३//

वेगाची थांबवन्या अफाट शक्ती

मिळवण्या व्यसनावर कायमची मुक्ती

"ब्रेक"हाच एक उपाय मोठा

ब्रेक दाबा, होणार नाही तोटा//४//

दिनांक 21/11/2021

कवी: जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद.

@जनार्दन ©®

Comments

Popular posts from this blog

"पासिंग नंबर"

"मौन निमंत्रण"