"समयी मधली वात"

 विषय:"समयी मधली वात"


शिर्षक:" शिकवण जगण्याची"

समयी मधली वात देते

आपल्याला शिकवण जगण्याची

ज्ञानरूपी प्रकाश देऊन जाते

अखंडित जळते पर्वा नसते कुणाची//१//

शिकुन घ्यावे आपणही थोडे

तेवणाऱ्या ईवल्याशा वातीकडून

त्याग करावा काही गोष्टींचा

बसू नये कधी कशासाठी आडून//२//

समयी मधली वात तेवते

सोसते चटके प्रकाश देण्यासाठी

रुसत नाही, फुगत नाही कधीही

जगत नाही ती स्वार्थासाठी//३//

आदर्श वातीचा आपण घ्यावा

ज्ञानरूपी दिवा, मनात लावून

झिजवून देह,जगावे वातीसमान

इतरांसाठी दाखवावे आयुष्य जगून //४//

कवी: जनार्दन बाळा गोरे

औरंगाबाद.

@जनार्दन

©®

Comments

Popular posts from this blog

"पासिंग नंबर"

"मौन निमंत्रण"