"ओळख कवीची"
"ओळख कवीची"
विचारांच्या वाटा, सागराच्या लाटा
स्मितहास्य गाली, मुखी प्रसन्न छटा
ओळख अशी कवीची असते
मर्म जीवनाचे, कविलाच कळते//१//
मोजकेच बोलणे, विचारांना तोलने
भाव मनातील, लिहून काढणे
तळमळ साऱ्यांची,मनात वसते
ओळख अशी कवीची असते//२//
पाने, फुले, रान वेली
ऊन, पाऊस आणि सावली
विषयांची कमी कधी नसते
ओळख अशी कवीची असते//३//
मन होऊन पाखरू उडे
वाचन, लिखाणाचे वेड जडे
रचनेत ज्याला सुख गवसते
ओळख अशी कवीची असते//४//
छंद जोपासून, मिळवतो शांती
करतो निर्माण कवितेची उत्क्रांती
दयेचे पाझर, मनात दाटते
ओळख अशी कवीची असते//५//
दिनांक २७/०९/२०२१
कवी: जनार्दन बाळा गोरे
औरंगाबाद.
@जनार्दन
©®
अप्रतिम रचना
ReplyDeleteमनस्वी धन्यवाद आपल्या प्रतिसादाबद्दल
ReplyDelete