"प्रभात समयी"

 "प्रभात समयी"

प्रभात समयी, दाटता धुके

दिसते भुरके, रान सारे

पाना,पानांवर,दवबिंदू शोभा

जणु मोती नयनांना भासणारे//१//

निरव शांतता,असते सर्वत्र

चालते सत्र ऋतु नुसार

धरणी माय छान वाटते

करते भरजरी छान शृंगार//२//

खळखळ वाहते झऱ्याचे पाणी

गात मधूर,मंजुळ गाणी

घननिळा बरसे घेऊन जलधारा

हर्ष दाटतो साऱ्यांच्या मनी //३//

प्रभात समयी, रमणीय सारे

मंद, मंद वाहती वारे

प्रसन्न वाटते,वातावरण सारे

येतात भरून ढग बरसणारे //४//

दिनांक २४/०८/२०२१

कवी: जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद.

@जनार्दन.

Comments

Popular posts from this blog

"पासिंग नंबर"

"मौन निमंत्रण"