"पाऊस"
" पाऊस"
हल्ली पावसाची राहिली नाही हमी
पाऊस पडतो कुठे जास्त तर कुठे कमी
पावसाविना चालत नाही काही
पाण्याविना हांबरतात गोठ्यातल्या गाई//१//
माणूस तर माणूस, प्राणीही आहेत हैराण
नाही प्यायला पाणी, नाही खायला वैरण
नदी नाले सारे आटले
प्राणी सारे पळत सुटले//२//
पाऊस लहरीपणाने वागतो
भलत्याच दिशेला स्वच्छंद बरसतो
त्याची मर्जी तो चालवितो
वाट सर्वांना पाहायला लावतो//३//
येईल का पाऊस ढगभरून
जाईल कधी नदीला पाणी भरून
जेंव्हा होईल स्वच्छंद बरसात
तेंव्हा होईल आनंदाला सुरुवात//४//
कवी जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद
Comments
Post a Comment