"भेट आपली वादळातली"
" भेट आपली वादळातली"
भेट आपली वादळातली
आहे अजूनही स्मरणात
होतात जागी आठवणी
अडकलो होतो पावसात//१//
चिंब भिजविले पावसाने
वाराही होता निवांत
आले अचानक वादळ
पसरले होते सुसाट//२//
गोड वाटले स्पर्शाने
मन बावरले हर्षाने
मने आपली जोशात
उभे आपण वादळात//३//
भेट आपली वादळातली
ठरली होती अविस्मरणीय
वाट पाहतो वादळाची
मना वाटण्या रमणीय//४//
बेचैन झालेल्या मनाला
चालते करण्या क्षणाला
यावे पुन्हा तेच वादळ
मिटवण्या मनाची तळमळ//५//
दिनांक २२/०५/२०२१
कवी: जनार्दन बाळा गोरे
औरंगाबाद.
@जनार्दन
Comments
Post a Comment