"पहाट झाली"
"पहाट झाली"
सप्त वारुंवर आरूढ होऊन
आले सूर्यदेव, प्रकाश घेऊन
कोवळी ही रम्य पहाट झाली
धरणी ही दवबिंदूत न्हाली//१//
निरव शांतता पसरली चोहीकडे
दिसते रमणीय उंच डोंगरकडे
सोनेरी ऊन, छान पडले
धुकेही दाट डोंगरी दाटले//२//
डोंगर रांगा सुशोभित झाल्या
वृक्ष, वेली सजल्या, वनातल्या
नितळ पाणी, वाहे खळ, खळ
पहाटेच्या समयी, भरावी ओंजळ//३//
प्रसन्न वाटते सारे वातावरण
धरणी भोवती, सूर्याचे आवरण
मनाला देते नवी उभारी
वाटते रमणीय, पहाट सारी//४//
दिनांक:१४/०६/२०२१
कवी: जनार्दन बाळा गोरे.
औरंगाबाद
Comments
Post a Comment