"आशेचा किरण"

 ✍️✍️ आशेचा किरण✍️✍️

उगवला नभी,सुर्य नारायण

तसाच मनात, आशेचा किरण

नवी वाट, नवी पहाट

अवतीभवती धुके घनदाट//१//

भरून आलं सारं आभाळ

दिसते खास रमणीय सकाळ

आशेवर जगते, पावसाच्या सारे

दिसतील मेघ, बेधुंद बरसणारे //२//

आशेचा किरण, पडता सृष्टीवर

उजळली धरणी, उजेड मनावर

 पहाट आणते, आशेचा किरण

बदलते दिशा, मिळते नवे वळण//३//

आशा आपल्या जीवनाचा भाग

होता पहाट येते आशेची जाग

आशेचा किरण मना, मनात

आशा फुलते क्षणा, क्षणात//४//

जोवर आहे जगात रवि

मनात राहील आशेची छवि

आशा जीवन आपले फुलविते

आशेचे किरण, स्वप्ने सजविते//५//

दिनांक ०८/०८/२०२१.

✍️✍️ कवी: जनार्दन बाळा गोरे

औरंगाबाद.

@जनार्दन

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

"पासिंग नंबर"

"मौन निमंत्रण"