दहीहंडी
विषय: दहीहंडी
सवंगडी घेऊन, कान्हा
करी दहीहंडीची चोरी
माठ दह्याचे फोडी
भरवी वस्त्रे भरजरी//१//
गोपिका करती तक्रारी
घरी यशोदेच्या जाऊन
कृष्ण कान्हा नकळत
बसे कोपऱ्यात लपून//२//
बाललीला त्या अनोख्या
बाल कृष्णाने केल्या
दह्या दुधाच्या घागरी
एकेक करून फोडल्या//३//
दास जणू कृष्णाचा
लिहितो रचना मनोभावे
पाव मला आता देवा
नीज रुप मज दाखवावे//४//
कवी: जनार्दन बाळा गोरे.
औरंगाबाद.
[
Comments
Post a Comment