कवी मनाचा माणूस"
कविता जगून लिहितो
कवी मनाचा माणूस
सोसून दुःखे मनामध्ये
व्यक्त होतो पानामध्ये //१//
शब्द, शब्द अनुभवाचा
शिकवितो लीहिण्या कविता
सोसून हाल अपेष्टा
लिहितो जगण्यावर कविता//२//
असा कोणता विषय नाही
ज्यावर कविता लिहिली नाही
जगताना ध्यानी असते कविता
मन भरून येते, लिहिता, लिहिता //३//
अनुभवातून जन्मते, कविता
जगतो कविता, सदा सर्वदा
मनातील अनुभव कथन करतो
मांडतो जगण्याची व्यथा//४//
लिहिता, लिहिता विचारात
घडत गेले बदल अनेक
सुचत गेले क्षणा, क्षणाला
अनमोल शब्द नेक //५//
कवी: गोरे जनार्दन बाळा.
"कवी मनाचा माणूस"
कविता जगून लिहितो
कवी मनाचा माणूस
सोसून दुःखे मनामध्ये
व्यक्त होतो पानामध्ये //१//
मी
कोणत्या ना, कोणत्या
विचारात असतो मी
कविता लिहीत नाही
तर कविता जगतो मी //१//
अर्थचक्र मंदावलेले ,
प्रश्न संसाराचे,रुंदावलेले
खचून जातो मनातून
व्यक्त होतो कवितेतून //२//
मन होता अधिर
कविताच देते धीर
शब्दांची मिळते संगत
अनमोल त्यांची किंमत//३//
मनाच्या विश्वात रमतो
बनून एक कवी
सदैव असते मनी
दडलेली कवितेची छवी //४//
सुंदर, सुंदर विचार
देतात मनाला आधार
मी रचतो शब्दांची भिंत
तेंव्हा मला नसते कुठली खंत//५//
कवी: गोरे जनार्दन बाळा.
रविवार दिनांक २१/०६/२०२०:
कवी : गोरे जनार्दन बाळा
Address ;::; विवेकानंद कॉलनी pishor रोड कन्नड
तालुका ;; कन्नड
Dist ... औरंगाबाद
Pin code '::431103
WhatsApp number :::;;;:: 8956663540
Comments
Post a Comment